गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

तारेवरची पक्षी शाळा


  इलेक्ट्रीकची तार पक्ष्यांच बसायच आवडत स्थान . त्यांनी आपली म्हणजे मानवाची निर्मिती त्यांच्या आयुष्यात व्यवस्थीत स्विकारलीय त्याच एक ध्योतकच आहे.

     कधि एकटे ,कधि जोडी तर कधि थवे अश्या आसन व्यवस्थेत ते बसलेले दिसून येतात.



 

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

पहाटेच चंद्र दर्शन


   पहाटे 5.30 पहिला चंद्र ( पहिला फोटो)आणि  5.41 दुसरा फोटो .पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पोर्णिमेच्या दोन तिन दिवस आधि व नंतरही असतोच .हे निसर्ग चंक्र ,कल्पनातित आहे. 

    पुर्वे कडून सुर्योदय होण्या पूर्विची लालीमा हळूहळू आकाशात पसरायला लागते व चांदोबा अजुनही सूर्यास्ताच्या वेळी सुर्य जसा असतो तसा दिसतोय.

      हे आपण स्वत:च्या  नजरेने बघितल नाहि तर हा सुर्यच आहे अस आपण ठाम पणे सांगू पण जेव्हा हा अनुभव आपण स्वत: घेतो तेव्हा आहा! काय सुरेख चंद्र , तेही या वेळी ,अस स्वत: लाच म्हटल्या शिवाय राहत नाही.

    पहाटे लवकर उठण्याच्या अनेक फायदयां मधे अजुन एक फायदा  जोडला गेला ,"पहाटेच चंद्र दर्शन".

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

पक्षी मेळा


 दिसतायत का फांदिवर पक्षी,मैना ,बुलबुल आणि पारवा. अशी सगळी मंडळी ऐका वेळी या फांदीवर अवतरली होती.

सकाळी इथे भेट देणारे बरेच असतात म्हणजे बुलबुलच्या तिन चार जोड्या असतात तर मैनेचा थवा ,तर कधी दोन तिन सुर्यपक्षी ,नर मादी दोन्ही,तर कधि कधि   पोपट येतो एखादा ,





एखादा खंड्या पण आपली हजेरी लावून जातो, कधि कधि बगळा दिसतो एखादाच ,पिटुकला शिंपी ,तर कधि चश्मेवाल्याची जोडी ,तर कधी कोतवाल पण जोडी ने हजेरी लावतो.तांबट ही येतो सकाळ संध्या काळ , धनेष अधुनमधुन . 

अश्या अनेक पक्ष्यांचा मेळा असतो या झाडावर मग ते पान असतानां किंवा निशपर्ण असतानांही.

रविवार, २५ एप्रिल, २०२१

बागेच्या कुंटुबातिल आणखी ऐक सदस्य मधमाशी


 
 सकाळी जशी आपली सगळ्यांची दिनचर्या सुरू होते तशीच ती प्राणी ,पक्षी यांचीही किंबहूना आपल्या पेक्षा जरा लवकरच दिनचर्या सुरू होते.

     तशीच ति मधमाश्यांची हि सुरू झाली . पेरूच्या फुलांवर ,चिकूच्या झाडावर  मधमाश्याच मधसंचय सुरू झालय.

         या प्रहरी त्या मोठ्या संख्येने उडताना दिसतात.म्हणूनच कदाचित वेडा राघू (Bee eater), भरद्वाज बागेत दिसतात.

    संध्या बागेत तिन पोळी आहेत एक मोठ्ठ आंब्याच्या झाडावर जे खुपच  दाट पानांच्या आत आहे .

    तर एक शेवग्याच्या झाडावर आणि एक घराच्या स्लँबला.

या सगळ्यात त्या एकदाच चावल्यात मला पण माझ्या शिवाय इतर कुणि बागेत गेल तर मात्र बरयाचदा त्यांना माश्यानी चावा घेतला आहे.

      मला ऐकदा मी जरा अंधार पडल्यावर  फांद्याचे  कटिंग करत असतांना त्यांच्या पोळ्याला धक्का लागून त्यांना डिसटर्ब झाल आणि मग मला हि त्यांनी चावल.

    इतर वेळी बरयाचदा मी फुल तोडताना त्या आजुबाजूला उडत असतात पण  मी त्यांना किंवा त्या मला त्रास  देत नाहीत ,बागेतल्या इतर रहिवाश्यां सारख्या त्याही कायमच्याच रहिवाशि किंवा कुंटुबातिल सदस्य आहेत.

.

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

ओळखा कोण😄

 



 

   ओळखा बघु कोण ते? सुंदर रंग ,छान सा आकार मग तुम्हि म्हणाल त्यात काय ओळखायच हा तर फळांचा राजा आंबा .पण जरा थांबा 

आत्ता बोला हाच तो जो आंबा वाटत होता पण ति आहे पपई आहे की नाही गम्मत ?

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

पोपटाच येण


 पोपट पुर्वि पासून ओळखीचा आणि बरयाच घरां मधे पाळलेला असायचा ,त्याच पिंजरयात असण तेव्हा कधिच चुकिच वाटल नाहि पण आत्ता जाणिवा समृध्द झाल्या पासून वाईट वाटत.

   तर असा हा पोपट फारच कमी वेळा बागेत दिसला ,मोजून दोन तिन वेळा.

      आज तो बराच वेळ होता ,या आधि  जोडी दिसली होति ति वायर वर.

    त्याच आपली भाषा बोलण या वैशिष्ट्या मुळे तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो.

  त्यात बागेत त्याच आवडत पेरूच झाड आहे तरी  तो का येत नाहि हा प्रश्न सतत सतावतो .

   पण आत्ता बागे पर्यंत पोहचलाय पुढे पेरू हि खाताना दिसेलच.

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

संक्रात वेल बहरली ति ही आत्ता




 हे वाचल्या वर संक्रात वेलीची आठवण झाली , 

     या वेळी खुप दिवस लांबलेला पावसाळा त्या मुळे गवत ही ऊशिरा काढल आणि वाढलेल्या वेलीं ची कटींग ही ऊशिराच केली पण मग त्याला बहार यायच्या सिझन मधे तो आलाच नाहि.संक्रात वेलीला फुल साधारण डिसेंबर मधे येतात व पुढे फेब्रुवारी पर्यंत त्या वर बहर असतो. 

     सुंदर केशरी रंगाचे लोंबकळते फुल ,झुबके डोळ्याच पारण फेडतात .

    पण या वर्षि वाटल आपण उगाचच ते कापत बसलो , सगळी कडे संक्रात वेलीवर फुलं आहेत आणि आपल्याच नाहीत .मन खट्टु झाल कारण ज्या गोष्टीची वाट बघत असतो ति वेळेवर दिसली नाहितर वाईट वाटत.

     बरेच दिवस तिकडे लक्ष दिल नाही ,त्याला आता पुढच्याच वर्षी फुल येतिल हे मनोमनी स्विकारल.

   पण अचानक त्याला कळ्या दिसल्या


 थोडिशिच का होईना पण संक्रात वेल बहरली ,म्हणून तर हे वाचल्या वर वाटल बहर येण्या पासून कोणिच थांबवू शकत नाही.

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

तांबट आलाय


    आवाज ओळखीचा वाटला म्हणून वर पाहिल तर हे महाराज म्हणजे तांबट बसलेला होता.चार पाच महिन्यांनी त्याला पाहिलय आज .

    दोन तिन दिवसां पासून आवाज यायचा पण तो  दृष्टिस पडत नव्हता .

   पण आज दिसलाच ऐकदाचा,पण बहुतेक हे पिल्लूच असाव अस वाटत .

       पण मला या तांबट म्हणजे काॅपर स्मिथच जरा वेगळच वाटत ते पिवळ लाल काॅम्बीनेशन पण शरिरात फार डौल असा वाटत नाही आणि आवाज पण वेगळाच . असो  तरीही देवाची प्रत्येक रचना वेगळी आणि त्या वेगळेपणात त्याच वेगळ अस सौंदर्य.

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

हे निसर्गची जाणो

 

 हे अंजीराचेच झाड ,खोड पूर्णपणे वाळवी किंवा दुसरया कुठल्या तरी किडी मुळे खराब झालेय ,वर शेंड्या वरच्या फांद्या पण पार निशपर्ण झाल्यात पण   खोडाच्या मुळा पासून बरेच फुटवे फुटलेत आणि त्याच्या फांदया झाल्यात वर अंजीरही आलेत.

    खरतर या वर्षी अती पावसाने बरीच झाड गेली काही तर अचानक काळवंडली वाटल की फुटतिल पान पण ति वाळलीच ,अंजीराच्या बाबतितही असच वाटल ,या झाडाच विशेष अस कि पान नसली तरी किंवा फळ नसतिल अगदि  तेव्हा ही कोकिळ ,धनेश ,भरद्वाज ,बुलबुल ,चिमण्या, मैना  हे सगळे त्या ऊंच फांदयां वर दिवसातून एकदा तरी बसलेले दिसतात ,कधि ऊडता ऊडता विसाव्याला  सकाळी तर कधि संध्याकाळी.

        आणि अंजिर असतिल तेव्हा तर हे सगळे येतातच पण तांबट , परिट ,वेडा  राघू ,कधि कधि चश्मेवाला ,दयाळ हे ही असतात.तांबट,कोकिळ,बुलबुलआणि धनेशाला मी अंजीर खाताना पाहिलय . 

    तर अस हे अंजीर परत या पक्ष्यां साठी सेकंड इनिग करतय हे कस ते निसर्गची जाणो  पण त्या साठी त्याला मना पासून धंन्यवाद ,नाहीतर माझे इतके मित्र मी गमावले असते ना.

डाळिंब


      ही डाळिंबा ची फुलं . रंग सुरेख, पण मी कित्त्येक दा दुसरया कुठल्या तरी रंगाच्या वर्णनात डाळींबी रंग असा उल्लेख ऐकलेला म्हणून जरा संमभ्रमात होते.मग तो दाण्यांचा असावा पण त्यात  ही दोन रंगाचे दाणे असतात मग? असो---

    तर या सुंदर फुलांनी आज मनाला मोहून टाकल . 

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

वेडाराघू परतला


   आज बरयाच दिवसांनी  वेडाराघू,आपला बी इटर परत दिसला आणि बहुतेक त्याला बी म्हणजे मधमाशी पण सापडलीय कारण काहि तरी खातोय आणि परत परत ऐक झेप घेऊन बसतोय ,तोंडात जे आहे त्याला झटके देतोय.

 त्याच्या आडव्या तिडव्या उडन्यानेच तर त्याला वेडा राघू म्हणतात .मी त्याला खुप मिस करत होती.डिसकव्हरि वर राजस्थान मधे यांचे थवे दाखवले होते आणि ते तळ्याच्या पाण्यात सुर मारून आपले शरिर कसे थंड करतात हे दाखवले आता बघुया आपल्या कडे तो पाण्यात सुर मारतो का ते?

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

सावल्या दाट झाल्या


      उन्हाचा तडाखा वाढला तशी झाडांची सावली दाट झाली.

दुपारच्या कडक उन्हात पक्षी याच सावलीत  विसाव्याला येतात. प्राणी जमिनीवर ,झाडाच्या सावलीत निवांत , वामकुक्षी घेतात. 

    आपण लावलेल्या झाडा मुळे यानां सावलीत आसरा मिळतोय हे बघून ,ते वाढवतांना केलेल्या मेहनतीच चीज झाल अस आपसूकच वाटून जात.

               दाटी पानांची झाली 

             अडवती सुर्या  चे ऊन

               पसरवून फांद्याचे हात

           देई झाड मायेची सावली

           गातो कोकीळ गाण गोड

          आंब्याच्या ग झाडावर

         पक्षी येती विसाव्याला 

          सावल्या झाडांच्या दाट झाल्या

      


बुधवार, १४ एप्रिल, २०२१

बहर चिनी गुलाबाला


     सध्या मोगरा ,कुंदा या शुभ्र फुलांचा बहर आहे ,नावाला अबोली ची थोडी फुल येतात पण या चिनी गुलाबावर हि फुलांची बहार डोळे सुखावून जातेय. गुलाब आहेत ,जास्वंद ही आहेत पण कुठल्याच झाडावर रंगीत फुल फारशी नाहीतच.

      मग चिनी का होईना गुलाब फुलला आणि सुदंर रंग मोहवून टाकतोय सध्या .

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

मी परत येणार, मी परत परत येणार


 हे कडूलिंबाच झाड,खरतर काय म्हणूया कारण ते तर छोटुस दिसतय.

     हे पावसाळ्यात उगवतात अनेक झाड त्यातलच आपोआप उगवलेल कडूलिंबाच झाड.छोट असतानां काढून लावूया कुठे तरी अस ठरवलेल पण त्या वेळी अति पाऊस ,बरेच दिवस लांबलेला म्हणून मग ते तसच राहिल.

      नंतर मी बरयाचदा ते काढायचा प्रयत्न केला पण ते काहि केल्या निघेना मग मी वरच झाड कापून खाली बुंध्याशी जाळल वाईट वाटत होत कारण येरवी इकडे तिकडे उगवलेली झाड मी पिशवीत मोठी करून मग  ते दुसरी कडे लावायला देते, त्यातलीच दोन तिन झाड समोर ओपन स्पेस मधे आता सावली दयायला लागलित.त्यात आपण एक मोठ्ठ झालेल झाड अस संपवून टाकायला निघालोय .वेळीच काढून कुठेतरी लावायला हव होत नाहा का?

       आज ते बागेत नाही अस वाढवता येणार ,ते खुप मोठ होत शिवाय अश्या जागी वाढल तर इतर झाडांवर सावली पडेल हि अडचण आहेच.

    तर अस हे झाड तोडल, जाळल तरी परत परत येतय .पुनर्रोपण नाही करता येतय ना . बघुया, येरवी झाड जगवणारी मी याला जडसे ऊखाडायचा प्रयत्न करतेय तर त्याच हे उगवण कधि थांबवतेय ते?

रविवार, ११ एप्रिल, २०२१

दयाळाच गाण



      आज बरयाच वेळा पासून दयाळाची मधुर शिळ  ऐकू येत होति.आजकाल बरयाच पक्ष्यांचे आवाज ओळखायला यायला लागलेत ,म्हणून बाहेर आवाज आला की आपोआप पावल तिकडे वळायला लागतात.बरयाचदा बुलबुल इतके वेगवेगळे आवाज काढतो की गोंधळ होतो.

      तांबट,धनेश,भरद्वाज,दयाळ यांचे आवाज जरा वेगळे असतात.त्यात या दयाळ बाबाचां आवाज मधुर ,मंजुळ असतो.माझ्या लहाणपणी कुठल्या तरी इयत्तेत  हिंदीच्या पुस्तकात एका धड्यात या दयाळाच नाव  ऐकल होत.त्या नंतर काही महिन्या पुर्वी दयाळ पाटण्याच्या एका भटकंटीत समोर आला आणि कळल हाच तो मधुर स्वराचा दयाळ . मी माझ्या चँनलवर व्हिडीओ टाकले तेव्हा ते पाटण्यच्या जंगलातले होते आत्ता चार पाच महिन्यांन पासुन तो आधि तारेवर दिसायचा, मग दुपारच्या वेळी दाट सावलीत सदाफुलीच्या झाडावर बसलेला असतो . कधि सकाळी तर कधि संध्या काळी याचे मधुर गाणे कानावर पडते आणि पाय थांबले तरी कान कानसेन होत ते मधुर स्वर मनात भरून घेतात.

शनिवार, १० एप्रिल, २०२१

अलभ्यलाभ


   आज चक्क स्वयंपाक घराच्या खिडकीतूनच परिटाच दर्शन झाल.गेले अनेक दिवस तो मला लांबूनच दिसत होता.कित्येक दा तर अगदी संध्याकाळी दिसायचा म्हणून त्याचा फोटो पण निट काढता यायचा नाही.

    माझ्या चँनल वरच्या व्हिडीओतही तो अगदि लांबून शुट केल्या मुळे अगदी लक्ष देऊन बघितल तरच दिसतोय .

    हा अलभ्य लाभ मला अगदि सहज ,स्वयंपाक करतांना झाला.म्हणून Be always ready to catch the best in your cam.May it is best pick for which you are waiting for 😇😊

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

दोन्ही ही अप्रतिम !त्याच उगवन ,त्याच मावळण

 


  आहा ! हो असच काहीस वाटल ,सकाळी हा नयनरम्य नजारा बघुन . निसर्गावर प्रेम असणारया ,त्याच्या  सहवासाचा आनंद घेणारया कुठल्या ही मानवाला मोहवून टाकणारा हा सुर्योदय   

    

आणि हा सुर्यास्त .

  उगाचच नाही प्रतेक पर्यटन स्थळी "Sunrise & sunset" बघायला गर्दी होत.हे सौंदर्य प्रत्येक दर्दीला डोळ्यात साठवून घ्यायच असत.असच ते आपल्याला कुठेही अनुभवता येत ,हो! प्रत्येक ठिकाणात त्याच त्याच वेगळेपण असत ,वेगळ सौंदर्य असत हे ही आहेच.

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

भँवरे की गुंजन

 'भँवरे की गुंजन' ,'भँवरा बडा नादान हाय,बगियन का मेहमान हाय ' आठवलीत का गाणि ,सनेमात चपखल बसवलेली गाणी त्यात या भँवरया वरची. याचा आवाजच  गुंजन करणारा .आज ही जोडी स्वयंपाक करतांना खिडकिपाशीच गुंजन करत होती ,निसर्गातल्या प्रत्येक हालचालीतल सौंदर्य काही वेगळच असत नाही का ? मग माझ्या डोळ्यांनी पाहीलेली प्रत्येकच गोष्ट मी या रोजनिशीत लिहीणार आहे म्हणून हे ही दृष्य तुमच्या डोळ्यां साठी.


सोमवार, ५ एप्रिल, २०२१

माकडांच येण.

     बरीच माकड येतायेत दोन- तिन दिवसां पासून पाच ते सहा माकडांचा कळप असतो.शेवगा, आंबा,सोनचाफा आणि  गुलाबाची पान खातात .

      बागेत पेरू,चिक्कू,अंजीर आहेत पण हे तिकडे फिरकलेच नाहीत.

   काय कारण असाव?

  माकड म्हणजे आपले  पूर्वज अस म्हटल जात पण त्यातल्या कुठल्या जातीशी आपल साधर्म्य  आहे ,बहूतेक चिंपाझी असावे का?जेन गुडाल हिच्या अभ्यासात ती सांगते कि मानव व चिंपाझी याच्यात फक्त एका गुण सुत्राच्या जोडीमुळे ते चिंपाझी आणि आपण मानव ठरलो.

    यात बरच संशोधन झालाय आणि सध्या सूरू ही आहे.

माकड आपल्याला जास्त परिचयाची कारण आपल्या आसपास बरयाच दा आढळतात.काही ठिकाणी मंदीरात ही ते दिसून येतात.हनूमानाचा अवतार म्हणून लोकां कडून त्यांची बरयाच ठिकाणी बडदास्त ठेवली जाते.

       माकडांच्या बाबतित मागे एकदा मारूति चितमपल्ली यांच्या नावानी एक पोस्ट फिरत होति त्यात ते लिहितात कि दुष्काळाची चाहूल माकडानां आधिच लागते आणि म्हणून वयस्कर माकड काही पानांचा चोथा करून त्याचे लाडू  ( तहाण लाडू भूक लाडू सारखे) आपल्या मुलां सीठी साठवूण ठेवतात.

     व हे अन्न सगळ्यां ना पुरणार नाही म्हणून वयस्कर माकड आपला जीव देतात जेणे करून उरलेल्या तरूण ,लहाण माकडांना ते पुरेल. 

प्राण्यांच जग गुढ आहे ,ते काय? काय? कस ?कस? करतात याचा अभ्यास करणारया बरयाच अवलियांनी आपल्या आयुष्यातिल अनेक वर्ष त्यांच्या सोबत घालवून केलाय आणि त्या साठीची चिकाटी ,त्याग तसे तपस्विच करू शकतात. त्यांच्या मुळेच आपल्या पर्यतं या गोष्टी पोहचतात .सो धन्यवाद त्या सगळ्या महान तपस्व्यांना.🙏
 

हरबरा आत्ताही फुलला

                                       नविन हरबरा बाजार समित्यां मधे यायला लागलाय आणि मी काय हा फोटो शेअर करतेय नाही का? 
 खर सांगू का या वर्षि ओला हरबरा खायलाच मिळाला नाही हे एक कारण आणि मी काही दिवसां पूर्वि एका पक्षी प्रेमी माणसा बद्दल वाचल ज्याने फक्त पक्ष्यां साठी धान्य पेरल.मग मी ही विचार केला की शेतात जे धान्य पेरल जात ते थोड का होईना आपणही पेरायच ,तस तर बाजरीचे  दाणे असतात ठेवलेले  पण ते फक्त चिमण्याच खातांना दिसतात इतर पक्षी फळ , मिलीबग आणि इतर काय काय खतात बागेत ,सरडे ,मधमाश्या इत्यादी.
   त्यात बाजरी ,मका ,ज्वारी आणि हा हरबरा पेरला .
  बाजरी,ज्वारी आणि हरबरा तेवढा उतरला आणि विशेष म्हणजे गारपिटीत सपाटून मार खावून जमिनदोस्त झालेल्या या हरबरयाने परत मान धरली आणि त्याला फुलही आल हे विशेष  ते इवलस गुलाबी रंगाच फुल या हिरव्यागच्च हरबरयावर अधिकच खुलुन दिसत होत म्हणून त्याच्या बद्दल लिहती झाले येवढच.


 

कुंदाच चांदन्

कुंदा !  टपोर ,शुभ्र ,सुगंधी फुल.याच्या वेलाची ही  जागा बदलली आणि याच्या साईज मधे आणि संख्येत फरक पडला .काहीं वनस्पति सन लविंग असतात अस म्हणुया का ? सुर्यफुल आपल्याला माहीत आहे पण बरीच फुलांची झाड ऊन चांगल मिळाल की जास्त  बहरतात त्याततलच हे कुंदा.                                  
चांदन फुलल हे कुंदाच्या वेलीवर
टपोर ,शुभ्र ,सुगंधी मोहरल.
दरवळतो गंध तयाचा 
मोहक हा अंगणी
सजला देव्हारा 
या फुलांपरी



 

मनिमाऊची फँमिली टेकिंग सनबाथ😄

 

 हि मनीची फँमिली,मम्मा & दोन लेकी.हा रोजचा शिरस्ता ,सकाळी जिथे कोवळ ऊन मिळेल तिथे यांच बस्तान .अगदी नियमीत ! प्राणी, पक्षी आपल्या शारिरीक गरजा व्यव्स्थित जाणून असतात ,त्यांना कुणी डाँक्टर नाही सांगत  'ड'जीवनसत्वा साठी ऊन्हात बसायला,पण हे नियमीत ऊन्हात बसतात( कोवळ्या) .सकाळी जसा सुर्य ऊगवायला सूरूवात होते तशी ज्या झाडावर ऊन येत तिथे पक्षी ऊंच फांदीवर बसलेले दिसून येतात.बागेतल्या ,शेवग्याच्या झाडावर अगदी ऊंच फांदीवर पारवा,बुलबुल,जांभळा सुर्यपक्षी ,कोकिळ, भांगपाडी मैना,सांळूखी,चिमण्या,भरद्वाज या सगळ्यांची हजेरी लागते.

       मनीमाऊ क्युट दिसतात पण छोट्या पक्ष्यांची शिकार त्या करतात ,वाघाच्या या माऊशीला झाडावर पटकन चढता येत आणि शिंपी , चश्मेवाला या सारखे छुटुकले पक्षी त्या शिताफीने पकडतात. वर आत्ता खिडकितल बिर्हाड हलवून टाकाव लागल त्यांच्या मुळे कारण पारव्याच्या घरट्यातली अंडी त्यांनी गट्टम केलीत .

   खरतर खुप राग येतो पण ही निसर्गातिल साखळी आहे, प्रत्येक जीव कुणावर तरी अवलंबून असणारच.



हि वामकूक्षीची तयारी ,पण हळूच केव्हा शिकार करेल माहीत नाही.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भरद्वाजाचा सहवास

 

  आज हे महाराज पण बरेच निवांत पणे बागेत फिरत होते.आधि बरयाचदा माझी चाहूल लागताच ऊडून जात ,पण आज आजूबाजूला रपेट चालू होती.भरद्वाजाचा आवाज तसा भारदस्त कित्तेक वेळा वाटायच कि माकड आलीत पण तो आसपास दिसायला लागला  आणि हा आवाज भरद्वाजाचा आहे हे कळल. बरयाचदा सकाळी दोन भरद्वाजां मध्ये जुगल बंदी चालू असते एक या टोकावर तर दुसरा दुसरया टोकावर आवाजाला साद प्रतिसाद देत असतो.

   एकदा त्याने नारळाचा झाडावर सरडा पकडा चोचीत पण तेव्हा कॅमेरा रेडी नव्हता ,सो ---

  आज परत संध्याकाळी पण नारळाच्या झाडावर सारखा गोल काही तरी शोधतच होता ,पण बरयाच वेळा नंतर शोध थांबवून पानांवर बसून घेतल


क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...