आज बरयाच वेळा पासून दयाळाची मधुर शिळ ऐकू येत होति.आजकाल बरयाच पक्ष्यांचे आवाज ओळखायला यायला लागलेत ,म्हणून बाहेर आवाज आला की आपोआप पावल तिकडे वळायला लागतात.बरयाचदा बुलबुल इतके वेगवेगळे आवाज काढतो की गोंधळ होतो.
तांबट,धनेश,भरद्वाज,दयाळ यांचे आवाज जरा वेगळे असतात.त्यात या दयाळ बाबाचां आवाज मधुर ,मंजुळ असतो.माझ्या लहाणपणी कुठल्या तरी इयत्तेत हिंदीच्या पुस्तकात एका धड्यात या दयाळाच नाव ऐकल होत.त्या नंतर काही महिन्या पुर्वी दयाळ पाटण्याच्या एका भटकंटीत समोर आला आणि कळल हाच तो मधुर स्वराचा दयाळ . मी माझ्या चँनलवर व्हिडीओ टाकले तेव्हा ते पाटण्यच्या जंगलातले होते आत्ता चार पाच महिन्यांन पासुन तो आधि तारेवर दिसायचा, मग दुपारच्या वेळी दाट सावलीत सदाफुलीच्या झाडावर बसलेला असतो . कधि सकाळी तर कधि संध्या काळी याचे मधुर गाणे कानावर पडते आणि पाय थांबले तरी कान कानसेन होत ते मधुर स्वर मनात भरून घेतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा