हे कडूलिंबाच झाड,खरतर काय म्हणूया कारण ते तर छोटुस दिसतय.
हे पावसाळ्यात उगवतात अनेक झाड त्यातलच आपोआप उगवलेल कडूलिंबाच झाड.छोट असतानां काढून लावूया कुठे तरी अस ठरवलेल पण त्या वेळी अति पाऊस ,बरेच दिवस लांबलेला म्हणून मग ते तसच राहिल.
नंतर मी बरयाचदा ते काढायचा प्रयत्न केला पण ते काहि केल्या निघेना मग मी वरच झाड कापून खाली बुंध्याशी जाळल वाईट वाटत होत कारण येरवी इकडे तिकडे उगवलेली झाड मी पिशवीत मोठी करून मग ते दुसरी कडे लावायला देते, त्यातलीच दोन तिन झाड समोर ओपन स्पेस मधे आता सावली दयायला लागलित.त्यात आपण एक मोठ्ठ झालेल झाड अस संपवून टाकायला निघालोय .वेळीच काढून कुठेतरी लावायला हव होत नाहा का?
आज ते बागेत नाही अस वाढवता येणार ,ते खुप मोठ होत शिवाय अश्या जागी वाढल तर इतर झाडांवर सावली पडेल हि अडचण आहेच.
तर अस हे झाड तोडल, जाळल तरी परत परत येतय .पुनर्रोपण नाही करता येतय ना . बघुया, येरवी झाड जगवणारी मी याला जडसे ऊखाडायचा प्रयत्न करतेय तर त्याच हे उगवण कधि थांबवतेय ते?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा