खर सांगू का या वर्षि ओला हरबरा खायलाच मिळाला नाही हे एक कारण आणि मी काही दिवसां पूर्वि एका पक्षी प्रेमी माणसा बद्दल वाचल ज्याने फक्त पक्ष्यां साठी धान्य पेरल.मग मी ही विचार केला की शेतात जे धान्य पेरल जात ते थोड का होईना आपणही पेरायच ,तस तर बाजरीचे दाणे असतात ठेवलेले पण ते फक्त चिमण्याच खातांना दिसतात इतर पक्षी फळ , मिलीबग आणि इतर काय काय खतात बागेत ,सरडे ,मधमाश्या इत्यादी.
त्यात बाजरी ,मका ,ज्वारी आणि हा हरबरा पेरला .
बाजरी,ज्वारी आणि हरबरा तेवढा उतरला आणि विशेष म्हणजे गारपिटीत सपाटून मार खावून जमिनदोस्त झालेल्या या हरबरयाने परत मान धरली आणि त्याला फुलही आल हे विशेष ते इवलस गुलाबी रंगाच फुल या हिरव्यागच्च हरबरयावर अधिकच खुलुन दिसत होत म्हणून त्याच्या बद्दल लिहती झाले येवढच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा