आज हे महाराज पण बरेच निवांत पणे बागेत फिरत होते.आधि बरयाचदा माझी चाहूल लागताच ऊडून जात ,पण आज आजूबाजूला रपेट चालू होती.भरद्वाजाचा आवाज तसा भारदस्त कित्तेक वेळा वाटायच कि माकड आलीत पण तो आसपास दिसायला लागला आणि हा आवाज भरद्वाजाचा आहे हे कळल. बरयाचदा सकाळी दोन भरद्वाजां मध्ये जुगल बंदी चालू असते एक या टोकावर तर दुसरा दुसरया टोकावर आवाजाला साद प्रतिसाद देत असतो.
एकदा त्याने नारळाचा झाडावर सरडा पकडा चोचीत पण तेव्हा कॅमेरा रेडी नव्हता ,सो ---
आज परत संध्याकाळी पण नारळाच्या झाडावर सारखा गोल काही तरी शोधतच होता ,पण बरयाच वेळा नंतर शोध थांबवून पानांवर बसून घेतल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा