कोरल वाईन हे याच हे याच इंग्रजीतल नाव.. तशी याला अजून बरीच नाव आहेत, कोरालिटा,कोरल बेल्स, कोरल क्रिपर, हार्टस्आँन अ चेन,चायनीज लव वाईन,क्विन्स ज्वैल्स,ब्राईड्स टियर्स,बी बूश, माऊंटेन रोज अजून काहि नावं आहेत,हे अमिरिकेतून आलेल असल्यामुळे याला भारतिय भाषांन मधे नावं मिळण तस कठिणच, पण मराठीत याला आईस्क्रीम वेल, बंगालीत अनंतलता,तमिल भाषेत कोडीरोज किंवा कोटी रोजा,ओडिसात हि वेल मोठ्या प्रमाणात पसरलेली दिसते, ओडिया भाषेत याला बूंदी का फूल म्हणतात..
माझ्या बागेत हे आत्ताच आलय, मी गेली दोनतीन वर्ष याचा शोध घेत होते, पण ते आत्ता मिळाल..
सुंदर गुलाबी फुलांचे तोरणं... हो तोरणच आणि हे तोरण बघुनच ते मला हवहवस वाटलं.. खुपदा नावंच आठवत नव्हतं..
आहे ना सुंदर... गुलाबी, चिमुकली फुलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा