हि मनीची फँमिली,मम्मा & दोन लेकी.हा रोजचा शिरस्ता ,सकाळी जिथे कोवळ ऊन मिळेल तिथे यांच बस्तान .अगदी नियमीत ! प्राणी, पक्षी आपल्या शारिरीक गरजा व्यव्स्थित जाणून असतात ,त्यांना कुणी डाँक्टर नाही सांगत 'ड'जीवनसत्वा साठी ऊन्हात बसायला,पण हे नियमीत ऊन्हात बसतात( कोवळ्या) .सकाळी जसा सुर्य ऊगवायला सूरूवात होते तशी ज्या झाडावर ऊन येत तिथे पक्षी ऊंच फांदीवर बसलेले दिसून येतात.बागेतल्या ,शेवग्याच्या झाडावर अगदी ऊंच फांदीवर पारवा,बुलबुल,जांभळा सुर्यपक्षी ,कोकिळ, भांगपाडी मैना,सांळूखी,चिमण्या,भरद्वाज या सगळ्यांची हजेरी लागते.
मनीमाऊ क्युट दिसतात पण छोट्या पक्ष्यांची शिकार त्या करतात ,वाघाच्या या माऊशीला झाडावर पटकन चढता येत आणि शिंपी , चश्मेवाला या सारखे छुटुकले पक्षी त्या शिताफीने पकडतात. वर आत्ता खिडकितल बिर्हाड हलवून टाकाव लागल त्यांच्या मुळे कारण पारव्याच्या घरट्यातली अंडी त्यांनी गट्टम केलीत .
खरतर खुप राग येतो पण ही निसर्गातिल साखळी आहे, प्रत्येक जीव कुणावर तरी अवलंबून असणारच.
हि वामकूक्षीची तयारी ,पण हळूच केव्हा शिकार करेल माहीत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा