उन्हाचा तडाखा वाढला तशी झाडांची सावली दाट झाली.
दुपारच्या कडक उन्हात पक्षी याच सावलीत विसाव्याला येतात. प्राणी जमिनीवर ,झाडाच्या सावलीत निवांत , वामकुक्षी घेतात.
आपण लावलेल्या झाडा मुळे यानां सावलीत आसरा मिळतोय हे बघून ,ते वाढवतांना केलेल्या मेहनतीच चीज झाल अस आपसूकच वाटून जात.
दाटी पानांची झाली
अडवती सुर्या चे ऊन
पसरवून फांद्याचे हात
देई झाड मायेची सावली
गातो कोकीळ गाण गोड
आंब्याच्या ग झाडावर
पक्षी येती विसाव्याला
सावल्या झाडांच्या दाट झाल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा