तेरडा अनेक सिजनल फुलांपैकी एक .जो श्रावणाच्या आगमनाचाच जणु संदेश घेऊन येतो.
नाजुक असतात हि फुल पण या ऋतुत सतत टवटवित दिसतात.एकेरी पाकळीचे , डबल म्हणजे जरा भरगच्च अशी हि फुल खुप रंगात येतात . त्यात माझ्या बागेत हाच रंग अगदि बी न टाकता ही जास्तच येतो आणि गणपति बसायचा थोड आसपास टप्पोरी ,डबल पाकळीची गर्द अश्या लाल चुटुक तेरड्याची तिन चार रोप उतरतात.
तर अश्या श्रावणाच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेल्या श्रावणावर, श्रावन चाहुली वर चार ओळी तो बनता है
तेरडा फुलला
किती रंगाचा
निळा ,तांबडा
पिवळा ,पांढरा
अबोली अन टिपक्यांचाही
सुरवंटाची गर्दी झाली ती
वृक्षांच्या पानोपानी
काहींची तर फुलपाखरे झाली
रंगा रंगाची ,काही छोटी तर काहि मोठी ही
भिरभर उडती या फुलां हून त्या फुंला वरी
नव रंगा चे, नव तेजाचे
रूप पालटले या धरणीचे
श्रृगांर पाचुचा काय त्या परी
नटली ति तर नवरत्नांने
तर्हे तर्हेच्या फुलांनी सजली
आगमने या श्रावणी
उंच डोंगर
शिरी धरती जलधारा त्या
शिवाच्या जटांपरी
तुशार सुंदर , उडती किती वर
दव बिंदू ते मोहविती मज
इंद्रधनुचा ताज आगळा
या अंबराच्या भव्य शिरावर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा