हे अंजीराचेच झाड ,खोड पूर्णपणे वाळवी किंवा दुसरया कुठल्या तरी किडी मुळे खराब झालेय ,वर शेंड्या वरच्या फांद्या पण पार निशपर्ण झाल्यात पण खोडाच्या मुळा पासून बरेच फुटवे फुटलेत आणि त्याच्या फांदया झाल्यात वर अंजीरही आलेत.
खरतर या वर्षी अती पावसाने बरीच झाड गेली काही तर अचानक काळवंडली वाटल की फुटतिल पान पण ति वाळलीच ,अंजीराच्या बाबतितही असच वाटल ,या झाडाच विशेष अस कि पान नसली तरी किंवा फळ नसतिल अगदि तेव्हा ही कोकिळ ,धनेश ,भरद्वाज ,बुलबुल ,चिमण्या, मैना हे सगळे त्या ऊंच फांदयां वर दिवसातून एकदा तरी बसलेले दिसतात ,कधि ऊडता ऊडता विसाव्याला सकाळी तर कधि संध्याकाळी.
आणि अंजिर असतिल तेव्हा तर हे सगळे येतातच पण तांबट , परिट ,वेडा राघू ,कधि कधि चश्मेवाला ,दयाळ हे ही असतात.तांबट,कोकिळ,बुलबुलआणि धनेशाला मी अंजीर खाताना पाहिलय .
तर अस हे अंजीर परत या पक्ष्यां साठी सेकंड इनिग करतय हे कस ते निसर्गची जाणो पण त्या साठी त्याला मना पासून धंन्यवाद ,नाहीतर माझे इतके मित्र मी गमावले असते ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा