सकाळी जशी आपली सगळ्यांची दिनचर्या सुरू होते तशीच ती प्राणी ,पक्षी यांचीही किंबहूना आपल्या पेक्षा जरा लवकरच दिनचर्या सुरू होते.
तशीच ति मधमाश्यांची हि सुरू झाली . पेरूच्या फुलांवर ,चिकूच्या झाडावर मधमाश्याच मधसंचय सुरू झालय.
या प्रहरी त्या मोठ्या संख्येने उडताना दिसतात.म्हणूनच कदाचित वेडा राघू (Bee eater), भरद्वाज बागेत दिसतात.
संध्या बागेत तिन पोळी आहेत एक मोठ्ठ आंब्याच्या झाडावर जे खुपच दाट पानांच्या आत आहे .
तर एक शेवग्याच्या झाडावर आणि एक घराच्या स्लँबला.
या सगळ्यात त्या एकदाच चावल्यात मला पण माझ्या शिवाय इतर कुणि बागेत गेल तर मात्र बरयाचदा त्यांना माश्यानी चावा घेतला आहे.
मला ऐकदा मी जरा अंधार पडल्यावर फांद्याचे कटिंग करत असतांना त्यांच्या पोळ्याला धक्का लागून त्यांना डिसटर्ब झाल आणि मग मला हि त्यांनी चावल.
इतर वेळी बरयाचदा मी फुल तोडताना त्या आजुबाजूला उडत असतात पण मी त्यांना किंवा त्या मला त्रास देत नाहीत ,बागेतल्या इतर रहिवाश्यां सारख्या त्याही कायमच्याच रहिवाशि किंवा कुंटुबातिल सदस्य आहेत.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा