शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

सोनटक्का(Hedyachium coronarium)



 

सोनटक्का सुगंधी पांढरशुभ्र नाजुक फुल.बागेतला या वर्षीचा नवा मेंबर .लावल तर नोव्हेंबर मधे होत ,कर्दळी सारखा लांब दांडा मुळापासुन आणुन लावला . बरेच दिवस एकाचे चार झाले तरी कशालाच फुल नव्हत मग वाटल इथे नाहीच लागणार. ते मी नासिक हून आणल होत.

      पण पावसाने किमया केली ,सोबतच दोन दांड्याना घट्ट विणलेल्या वेणी सारख्या पेरांचे भरगच्च कळ्यांनी भरलेले गुच्छ /दांडे आले .मग ते उमलण्याची उत्सुकता लागली फार काही वाट बघावी लागली नाही आणि या नाजुक ,सुंगधी फुलाच दर्शन झाल एकदाच .पूर्ण फुलण्याच्या आधल्या दिवशी याच्या कळ्या पण छान लोंबत्या कानातल्या सारख्या  दिसतात आणि फुलं नाजुक असतात ,ति लगेच कोमेजतात म्हणून याच कळ्या बाजारात विकल्या जातात.

       असा हा सोनटक्का संध्याकाळी उमलतो ,सध्या सोनचाफा, परिजातक आणि सोनटक्का रात्री आणि पहाटेही परिसर त्यांच्या सुगंधाने व्यापुन टाकतात.नाजुक इतक की लगेच कोमेजेल आणि शुभ्र इतक की हात लावला तरी मळेल अस हे फुल 'सोनटक्का'.उमलल्यावर फुलाचा आकार फुलपाखरा सारखा दिसतो म्हणून इंग्रजीत याला 'Butterfly ginger lily' अस ही म्हणतात .

       हे झाड हळद आणि आल  या कुळातील  आहे आणि दलदलीच्या किंवा भरपूर पाण्याच्या ठीकाणी आढळतात, बारमही पुष्प असतात.

जिथे तिन्ही पाकळ्या एकत्र येतात त्याठिकाणी फुलाच्या मंध्यभागी पिवळ्या परागकणांची पिवळी धम्मक झाक असते.

   याची फुलं ,कंद ,खोड औषध निर्मितीत व सुंगधी द्रव्य बनवण्या साठी वापरतात.यात पिवळया रंगाचा पण सोनटक्का असतो ,पण तो दुर्मिळ.

 

      

 पान हिरलविगार ,समोरा समोर रचना असलेली यात ती फुल अजुनच उठुन दिसतात.

      तर असा हा सोनटक्का स्री सुलभ म्हणजे नाजुक ,सुंदर आणि बर का एखाद्या थकुन वा नाराज होऊन कोमेजलेल्या स्री ला सोनटक्क्याची उपमा दिली जाते ,आत्ता नाही ऐकीवात , पण पूर्वि एखाद्या मराठी चित्रपटात वा नाटकात किंवा मग कादंबरीत हे वर्णन ऐकायला मिळायच हे नक्की.

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

केशरी बिगोनिया(Tecoma capencic


   केशरी बिगोनिया इंग्रजी नाव टेकोमा कपेनसिस सुंदर केशरी रंगाच्या फुलांचे झुबके ,हिरव्या भरगच्च पानांच्या मधे मधे सुंदर काँम्बीनेशन . या ऋतुतला पहिला बहर ,अजून पुढे जास्त येतिल फुल मग हिरवी पान अधनमधन दिसतिल ,केशरि रंगाची मक्तेदारी वाढेल मग काय?

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

लाजाळु (shame plant)

लाजाळु जस नाव तसा गुण कि जसा गुण तस नाव😊
तर लाजाळुच्या पानांशी खेळायला गम्मत वाटायची लहाणपणि.आत्ता मुलं खेळतात तेव्हा तो चेहरयावरचा भाव बघायला ही छान वाटत.
स्पर्श होताच क्षणात मिटणारी ती पान, त्याच विद्न्यान वेगळ असेल वनस्पति शास्रात. पण त्याची इंग्रजी नाव मजेशीर आहेत सेनसिटीव प्लाँट, शेम प्लाँट   पण आपल मराठीच नाव छान लाजाळु ,नव्या नवरी सारख .                         

 

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

Blister beetle

 

   हे ब्लिस्टर बीटल ,आपण भुंगा म्हणुया कारण याच मराठी शास्त्रीय नाव मला नाही माहित .तर असा हा भुंगा आपण फोटोत बघतोय तस हे चार आहेत जास्वंदाच्या फुलावर ,नेहमी पावसाळ्यात दिसणारया काहि दृश्यांपैकी हे एक व याच ऋतुत दिसणारया अनेक किटकां पैकी हा एक.

      जास्वंदाचे फुल पूर्ण फस्त करून टाकतात .या दिवसात हि फुल संख्येने पण खुप असतात .निसर्गातल्या जीवसृष्टितला आणिक एक जीव बागेत वावरतोय याच समाधान.

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

श्रावण चाहुल


    तेरडा अनेक सिजनल फुलांपैकी एक .जो श्रावणाच्या आगमनाचाच जणु संदेश घेऊन येतो.

    नाजुक असतात हि फुल पण या ऋतुत सतत टवटवित दिसतात.एकेरी  पाकळीचे , डबल म्हणजे जरा भरगच्च अशी हि फुल खुप रंगात येतात . त्यात माझ्या बागेत हाच रंग अगदि बी न टाकता ही जास्तच  येतो  आणि गणपति बसायचा थोड आसपास टप्पोरी ,डबल पाकळीची गर्द अश्या लाल चुटुक तेरड्याची तिन चार रोप उतरतात.

    तर अश्या श्रावणाच्या आगमनाचा  निरोप घेऊन आलेल्या श्रावणावर, श्रावन चाहुली वर चार ओळी तो बनता है

      तेरडा फुलला 

     किती रंगाचा 

     निळा ,तांबडा 

       पिवळा ,पांढरा 

अबोली अन टिपक्यांचाही

सुरवंटाची गर्दी झाली ती

वृक्षांच्या पानोपानी

काहींची तर फुलपाखरे झाली

रंगा रंगाची ,काही छोटी तर काहि मोठी ही

भिरभर उडती या फुलां हून त्या फुंला वरी

नव रंगा चे, नव तेजाचे 

रूप पालटले या धरणीचे 

श्रृगांर पाचुचा काय त्या परी

नटली ति तर नवरत्नांने 

तर्हे तर्हेच्या फुलांनी सजली

आगमने या श्रावणी

   उंच डोंगर 

शिरी धरती जलधारा त्या 

शिवाच्या जटांपरी

तुशार सुंदर , उडती किती वर 

दव बिंदू ते मोहविती मज

इंद्रधनुचा ताज आगळा 

या अंबराच्या भव्य शिरावर 


     

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

शुटिंग स्टार


       नावात काय असत अस" शेक्सपियरच" वाक्य गेली अनेक वर्ष वारंवार आठवल जात .

      आपल नाव आपले आई- वडिल वा नातेवाईक ठेवतात हो काहींच ज्योतिशशास्रा नुसार अक्षर काढून मग नाव ठेवल जात त्या नावाला काही जागतात तर काहि नाही ,मग राम नाव असलेले एकीशी पण प्रामाणिक नसतात  (हो रामाला एक पत्निव्रता अस म्हटल जात ते मी वाचलय )

      संताची नाव असलेले महाभाग त्या नावाला काळिमा फासतात तर काही नाव अशिही असतात म्हणजे मुस्कान नाव आणि सतत चेहरा आपला रागीट ,

      असो -----

  फुल ,झाड ,पक्षी यांच्या निरीक्षणाच वेड लागल तेव्हा पासून नावांची मजा नव्याने अनुभवतेय म्हणजे बघा 1:भांग पाडीमैना हा डक्यावरचा केसांचा समभार बघा म्हणून भांगपाडी मैना


 2:कोतवाल :हा पक्षी आपल्या area तल्या इतर पक्ष्यांच मोठ्या शिकारी पक्ष्यां पासुन संरक्षण करतो,त्यांच्या अंगावर धाऊन जातो  म्हणुन हे कोतवाली करणारे कोतवाल.
3:बहुरूपि: याला हे नाव का दिलय माहित नाही 😄
  रात राणी: हि रात्री उमलते म्हणून रातराणी
 बरयाच  इंग्रजीतल्या नावात रेड हेडेड ,यलोफुटेड,ग्रे विंगड् अशी विषेशणांनी नाव दिलेली असतात .

       हि नावाची गम्मत या बागेत फुललेल्या झाडाच नाव शोधता शोधता मनात आली याच  इंग्रजीतल नाव शुटिंग स्टार आहे ,मराठीतल  गुलाबी भुईचक्र अस कळल . एका नवीन माहीतीत भर पडली ! निसर्ग अभ्यासाच्या वाटेवर😊

गुरुवार, १५ जुलै, २०२१

चिऊताई च नव घरट


   पार्किंग मधे बरीच खोकी लटकवूनही चिमणा बाईंना तिथे घरट बांधता आल नाही .

       मैने ने पार्किंग मधल्या  एका खोक्यात आपल घरट  बनवल व आत्ता ते दांपत्य पिल्लांच मिळून संगोपनही करताहेत. चिमणराव व चिऊताई्नी त्यांच्या शेजारी आपल बिर्हाड थाटायचा प्रयत्न केला पण ----

        शेवटी त्यांनी उंच खिडकित ठेवलेल्या शटल बाँक्स च्या वर घरट बांधायला घेतलय ,त्यात एका छोट्या बोळक्यात लावलेल Asparagus एक ऐक करत सगळीच पान किंवा पुंजके घरट्याच्या बांधकामासाठी वापरलेत हो जे वरच्या घरट्यात हिरव गवत दिसतय ना तेच .

       एक दिवस चिमणीची धडपड पाहिली होती ति पान उपटून काढताना .

    किती कष्ट घेतात ना हि पाखरही आपल्या पिलां साठी .

     आत्ता हे चिऊताईच नव घरट तिच्या पिलांन साठी तयार आहे व मी ही नव्या चिमण्यां पाखरांच्या चिवचिवाटा साठी.


क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...