शुक्रवार, २३ जुलै, २०२१

शुटिंग स्टार


       नावात काय असत अस" शेक्सपियरच" वाक्य गेली अनेक वर्ष वारंवार आठवल जात .

      आपल नाव आपले आई- वडिल वा नातेवाईक ठेवतात हो काहींच ज्योतिशशास्रा नुसार अक्षर काढून मग नाव ठेवल जात त्या नावाला काही जागतात तर काहि नाही ,मग राम नाव असलेले एकीशी पण प्रामाणिक नसतात  (हो रामाला एक पत्निव्रता अस म्हटल जात ते मी वाचलय )

      संताची नाव असलेले महाभाग त्या नावाला काळिमा फासतात तर काही नाव अशिही असतात म्हणजे मुस्कान नाव आणि सतत चेहरा आपला रागीट ,

      असो -----

  फुल ,झाड ,पक्षी यांच्या निरीक्षणाच वेड लागल तेव्हा पासून नावांची मजा नव्याने अनुभवतेय म्हणजे बघा 1:भांग पाडीमैना हा डक्यावरचा केसांचा समभार बघा म्हणून भांगपाडी मैना


 2:कोतवाल :हा पक्षी आपल्या area तल्या इतर पक्ष्यांच मोठ्या शिकारी पक्ष्यां पासुन संरक्षण करतो,त्यांच्या अंगावर धाऊन जातो  म्हणुन हे कोतवाली करणारे कोतवाल.
3:बहुरूपि: याला हे नाव का दिलय माहित नाही 😄
  रात राणी: हि रात्री उमलते म्हणून रातराणी
 बरयाच  इंग्रजीतल्या नावात रेड हेडेड ,यलोफुटेड,ग्रे विंगड् अशी विषेशणांनी नाव दिलेली असतात .

       हि नावाची गम्मत या बागेत फुललेल्या झाडाच नाव शोधता शोधता मनात आली याच  इंग्रजीतल नाव शुटिंग स्टार आहे ,मराठीतल  गुलाबी भुईचक्र अस कळल . एका नवीन माहीतीत भर पडली ! निसर्ग अभ्यासाच्या वाटेवर😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...