सोनटक्का सुगंधी पांढरशुभ्र नाजुक फुल.बागेतला या वर्षीचा नवा मेंबर .लावल तर नोव्हेंबर मधे होत ,कर्दळी सारखा लांब दांडा मुळापासुन आणुन लावला . बरेच दिवस एकाचे चार झाले तरी कशालाच फुल नव्हत मग वाटल इथे नाहीच लागणार. ते मी नासिक हून आणल होत.
पण पावसाने किमया केली ,सोबतच दोन दांड्याना घट्ट विणलेल्या वेणी सारख्या पेरांचे भरगच्च कळ्यांनी भरलेले गुच्छ /दांडे आले .मग ते उमलण्याची उत्सुकता लागली फार काही वाट बघावी लागली नाही आणि या नाजुक ,सुंगधी फुलाच दर्शन झाल एकदाच .पूर्ण फुलण्याच्या आधल्या दिवशी याच्या कळ्या पण छान लोंबत्या कानातल्या सारख्या दिसतात आणि फुलं नाजुक असतात ,ति लगेच कोमेजतात म्हणून याच कळ्या बाजारात विकल्या जातात.
असा हा सोनटक्का संध्याकाळी उमलतो ,सध्या सोनचाफा, परिजातक आणि सोनटक्का रात्री आणि पहाटेही परिसर त्यांच्या सुगंधाने व्यापुन टाकतात.नाजुक इतक की लगेच कोमेजेल आणि शुभ्र इतक की हात लावला तरी मळेल अस हे फुल 'सोनटक्का'.उमलल्यावर फुलाचा आकार फुलपाखरा सारखा दिसतो म्हणून इंग्रजीत याला 'Butterfly ginger lily' अस ही म्हणतात .
हे झाड हळद आणि आल या कुळातील आहे आणि दलदलीच्या किंवा भरपूर पाण्याच्या ठीकाणी आढळतात, बारमही पुष्प असतात.
जिथे तिन्ही पाकळ्या एकत्र येतात त्याठिकाणी फुलाच्या मंध्यभागी पिवळ्या परागकणांची पिवळी धम्मक झाक असते.
याची फुलं ,कंद ,खोड औषध निर्मितीत व सुंगधी द्रव्य बनवण्या साठी वापरतात.यात पिवळया रंगाचा पण सोनटक्का असतो ,पण तो दुर्मिळ.
पान हिरलविगार ,समोरा समोर रचना असलेली यात ती फुल अजुनच उठुन दिसतात.
तर असा हा सोनटक्का स्री सुलभ म्हणजे नाजुक ,सुंदर आणि बर का एखाद्या थकुन वा नाराज होऊन कोमेजलेल्या स्री ला सोनटक्क्याची उपमा दिली जाते ,आत्ता नाही ऐकीवात , पण पूर्वि एखाद्या मराठी चित्रपटात वा नाटकात किंवा मग कादंबरीत हे वर्णन ऐकायला मिळायच हे नक्की.
Khupch chhan
उत्तर द्याहटवाThank you
हटवा