पार्किंग मधे बरीच खोकी लटकवूनही चिमणा बाईंना तिथे घरट बांधता आल नाही .
मैने ने पार्किंग मधल्या एका खोक्यात आपल घरट बनवल व आत्ता ते दांपत्य पिल्लांच मिळून संगोपनही करताहेत. चिमणराव व चिऊताई्नी त्यांच्या शेजारी आपल बिर्हाड थाटायचा प्रयत्न केला पण ----
शेवटी त्यांनी उंच खिडकित ठेवलेल्या शटल बाँक्स च्या वर घरट बांधायला घेतलय ,त्यात एका छोट्या बोळक्यात लावलेल Asparagus एक ऐक करत सगळीच पान किंवा पुंजके घरट्याच्या बांधकामासाठी वापरलेत हो जे वरच्या घरट्यात हिरव गवत दिसतय ना तेच .
एक दिवस चिमणीची धडपड पाहिली होती ति पान उपटून काढताना .
किती कष्ट घेतात ना हि पाखरही आपल्या पिलां साठी .
आत्ता हे चिऊताईच नव घरट तिच्या पिलांन साठी तयार आहे व मी ही नव्या चिमण्यां पाखरांच्या चिवचिवाटा साठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा