सोमवार, १७ मे, २०२१

शहाणे प्राणी


  आज खुप दिवसांच बरचसे साठलेले पण वापरणार नाही असे काही बाही खाद्य पदार्थ गोळा केले आणि गाईला खायला दिले पण 

      उडदाचे पापड काही तिने खाल्ले नाही ,का खाल्ले नसावे बर ?

  उन्हाळ्याचा चारा कमी म्हणून दुभती जनावर पण सकाळी दुध काढल्यावर मोकळी सोडली जातात आणि हिच जनावर कुठे काय मिळेल ते खात सुटतात  त्यात गाईन उडदाचा पापड न खाण मला धक्का देणार होत .

         मीठ ,पापडखार जास्त असेल म्हणून तर तिन पापड खाल्ले नसतिल ना?

    

Rays of hopes, आशेची किरण

     


 आजच्या परिस्थितित केव्हा कुठली बातमी येईल किंवा कुठली परिस्थिती येईल सांगता येत नाही.जी गोष्ट आपल्या पर्यंत कधिच येणार नाही असा विश्वास असतांना अचानक त्याच भयानक रूप समोर येत आणि मग-------

      पण अशा परिस्थितित आपली माणस विविध स्थरावर अनेक भुजांनि आपल्या साठी ,आपल्या सोबत ऊभी राहतात कसलाहि विचार न करता तेव्हा वाटत "कुछ गलत तो हुआ है पर ------बहुतकुछ सही भी तो है !" आणि है असण परत उडायला बळ देत , उत्साह देत.

       किट्ट काळोखाच्या राति  

    एका काजव्याचा उलुसा प्रकाश 

   देई प्रकाशाची आस

       ढगाळल्या आकाशात 

         भेदनारि सुर्य किरणं

     देति सकाळची आस

संपत आले सारे काही

आता काहिच उरले नाही 

  तवा म्हणे कुणि तरी 

हा काहि अंत नाही 

एक आशावादी शब्द 

बने आधार जिवाचा

काय जाणो आत्ता 

नवे नवे होय 

काहि तरी


गुरुवार, ६ मे, २०२१

केळी परस बागेतली


    कुठल्याही युरिया वा रासायनिक खता शिवाय हे केळीचे  झाड बागेत ताठ उभे आहे  आणि छान घड त्याला लागलेला आहे. 
     केळीचे झाड हे माझ्या साठी नविन नाहि .माझ्या माहेरी वडिलांची केळीची  बाग आहे .
  पण त्याच परस बागेत ,अंगणात असण माझ्या साठी विशेषच.
मागच्या गारपिटीत त्याची पान फाटली आणि हा घड नजरेस पडला .
    आपल्या कुठल्या तरी सहभागातुन निर्माण झालेल्या गोष्टीला बघण्याच समाधान  काही औरच असत आणि तसच या बाबतित वाटल ,माहीती आहे हि निसर्गाची निर्मिती ,करता करविता तो परमेश्वर ,मी मात्र निमित्यं बस ऐवढच कारण समाधानाच ,निर्माणातल्या सहभागाच.

   

मंगळवार, ४ मे, २०२१

चिरक घरट्याच्या शोधात


      हि चिरक मादि ,दर वर्षि विणीच्या हंगामात पार्किंगच्या पत्र्याच्या गॅप मधे घरट करून अंडी घालते,नर काळा कुळकुळीत ,चमकदार असतो .यांची माहीती मी माझ्या युट्युब व्हिडिओत दिली आहे .

    दरवर्षी ची ओळख , सारखा आवाज करत असतात . मी बागेत पाणि घालते तेव्हा ही आळ्यात साचलेल्या पाण्यात मस्त डुंबत असते ,नर गेटच्या पट्ट्यांवर बसलेला असतो .
    पण या वर्षी जरा जागा बदलली वाटत कारण चिमण्या व त्यांच्यात त्या जागे साठी भांडण होत .
     आत्ता खरतर एका बाॅक्सच्या वर पारव्याच घरट आहे आणि अंडी ही दिलीत म्हणून मी आणिक दोन बाँक्स त्यांना घरटी  म्हणून अवेलेबल करून दिलेत बघुया कोण  कोण तिथे घरट बांधत.

रविवार, २ मे, २०२१

कमळ फुलता


 कमळ आज पर्यंत तलावात , बागेत , जंगल सफारीत असच बघायला मिळायच.

    आत्ता ते बरयाच प्रमाणात हौशी लोक घराच्या अंगणात मोठ्या कुंड्यान मधे ,परस बागेत लावायला लागलेत .

    त्याच हौशी लोकां मधे माझ्या  मागे राहणारी पुनम पाटील ,बिया मागवून तर कधि कंद आणून तर कधी कुठून कुठून आणून लहान मोठ्या टब मधे वाढवतेय ,बरयाच प्रकारची कमळ तिने जगवली व त्याला फुल येऊन अनेकांना कमळाचे  विविध रंग व प्रकार बघायला मिळाले .

      तिनेच दिलेल हे एक ज्या मुळे माझी ही कमळ संगोपनाची हौस पूर्ण झाली आणि बागेतल्या वैविध्यात भरच पडली .

शनिवार, १ मे, २०२१

खिडकितुन सुर्यपक्षी



   सुर्यपक्षी , मादि ,पिटुकला पक्षी, विशेष अँक्टिव ,अनेकदा दुरून फोटो साठी आटापिटा केला आणि आज तर स्वयंपाक करतांना खिडकितून चाफ्याच्या झाडावर बराच वेळ इकडुन तिकडे चालु होत मग काय काढला फोटो माझ्या आजच्या नोंदित अजून एक भर.

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...