आजच्या परिस्थितित केव्हा कुठली बातमी येईल किंवा कुठली परिस्थिती येईल सांगता येत नाही.जी गोष्ट आपल्या पर्यंत कधिच येणार नाही असा विश्वास असतांना अचानक त्याच भयानक रूप समोर येत आणि मग-------
पण अशा परिस्थितित आपली माणस विविध स्थरावर अनेक भुजांनि आपल्या साठी ,आपल्या सोबत ऊभी राहतात कसलाहि विचार न करता तेव्हा वाटत "कुछ गलत तो हुआ है पर ------बहुतकुछ सही भी तो है !" आणि है असण परत उडायला बळ देत , उत्साह देत.
किट्ट काळोखाच्या राति
एका काजव्याचा उलुसा प्रकाश
देई प्रकाशाची आस
ढगाळल्या आकाशात
भेदनारि सुर्य किरणं
देति सकाळची आस
संपत आले सारे काही
आता काहिच उरले नाही
तवा म्हणे कुणि तरी
हा काहि अंत नाही
एक आशावादी शब्द
बने आधार जिवाचा
काय जाणो आत्ता
नवे नवे होय
काहि तरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा