गुरुवार, ६ मे, २०२१

केळी परस बागेतली


    कुठल्याही युरिया वा रासायनिक खता शिवाय हे केळीचे  झाड बागेत ताठ उभे आहे  आणि छान घड त्याला लागलेला आहे. 
     केळीचे झाड हे माझ्या साठी नविन नाहि .माझ्या माहेरी वडिलांची केळीची  बाग आहे .
  पण त्याच परस बागेत ,अंगणात असण माझ्या साठी विशेषच.
मागच्या गारपिटीत त्याची पान फाटली आणि हा घड नजरेस पडला .
    आपल्या कुठल्या तरी सहभागातुन निर्माण झालेल्या गोष्टीला बघण्याच समाधान  काही औरच असत आणि तसच या बाबतित वाटल ,माहीती आहे हि निसर्गाची निर्मिती ,करता करविता तो परमेश्वर ,मी मात्र निमित्यं बस ऐवढच कारण समाधानाच ,निर्माणातल्या सहभागाच.

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...