शुक्रवार, २३ जुलै, २०२१

शुटिंग स्टार


       नावात काय असत अस" शेक्सपियरच" वाक्य गेली अनेक वर्ष वारंवार आठवल जात .

      आपल नाव आपले आई- वडिल वा नातेवाईक ठेवतात हो काहींच ज्योतिशशास्रा नुसार अक्षर काढून मग नाव ठेवल जात त्या नावाला काही जागतात तर काहि नाही ,मग राम नाव असलेले एकीशी पण प्रामाणिक नसतात  (हो रामाला एक पत्निव्रता अस म्हटल जात ते मी वाचलय )

      संताची नाव असलेले महाभाग त्या नावाला काळिमा फासतात तर काही नाव अशिही असतात म्हणजे मुस्कान नाव आणि सतत चेहरा आपला रागीट ,

      असो -----

  फुल ,झाड ,पक्षी यांच्या निरीक्षणाच वेड लागल तेव्हा पासून नावांची मजा नव्याने अनुभवतेय म्हणजे बघा 1:भांग पाडीमैना हा डक्यावरचा केसांचा समभार बघा म्हणून भांगपाडी मैना


 2:कोतवाल :हा पक्षी आपल्या area तल्या इतर पक्ष्यांच मोठ्या शिकारी पक्ष्यां पासुन संरक्षण करतो,त्यांच्या अंगावर धाऊन जातो  म्हणुन हे कोतवाली करणारे कोतवाल.
3:बहुरूपि: याला हे नाव का दिलय माहित नाही 😄
  रात राणी: हि रात्री उमलते म्हणून रातराणी
 बरयाच  इंग्रजीतल्या नावात रेड हेडेड ,यलोफुटेड,ग्रे विंगड् अशी विषेशणांनी नाव दिलेली असतात .

       हि नावाची गम्मत या बागेत फुललेल्या झाडाच नाव शोधता शोधता मनात आली याच  इंग्रजीतल नाव शुटिंग स्टार आहे ,मराठीतल  गुलाबी भुईचक्र अस कळल . एका नवीन माहीतीत भर पडली ! निसर्ग अभ्यासाच्या वाटेवर😊

गुरुवार, १५ जुलै, २०२१

चिऊताई च नव घरट


   पार्किंग मधे बरीच खोकी लटकवूनही चिमणा बाईंना तिथे घरट बांधता आल नाही .

       मैने ने पार्किंग मधल्या  एका खोक्यात आपल घरट  बनवल व आत्ता ते दांपत्य पिल्लांच मिळून संगोपनही करताहेत. चिमणराव व चिऊताई्नी त्यांच्या शेजारी आपल बिर्हाड थाटायचा प्रयत्न केला पण ----

        शेवटी त्यांनी उंच खिडकित ठेवलेल्या शटल बाँक्स च्या वर घरट बांधायला घेतलय ,त्यात एका छोट्या बोळक्यात लावलेल Asparagus एक ऐक करत सगळीच पान किंवा पुंजके घरट्याच्या बांधकामासाठी वापरलेत हो जे वरच्या घरट्यात हिरव गवत दिसतय ना तेच .

       एक दिवस चिमणीची धडपड पाहिली होती ति पान उपटून काढताना .

    किती कष्ट घेतात ना हि पाखरही आपल्या पिलां साठी .

     आत्ता हे चिऊताईच नव घरट तिच्या पिलांन साठी तयार आहे व मी ही नव्या चिमण्यां पाखरांच्या चिवचिवाटा साठी.


मंगळवार, १३ जुलै, २०२१

रात राणी


        कुठल्याच फुलांच्या झाडाला इतका बहर कधिच येत नाहि पण रात राणी मनसोक्त बहरते नि रात्रि मन मोहुन टाकते तिच्या सुंगधाने .

       रात राणीची गंमत न्यारी
    फुल नाजुक, शुभ्र पांढरी
 रात्रीच्या कुशित दरवळ तिचा
       मादक ,मोहक 
ओतल्या जश्या अंत्तराच्या कुप्या
    बहरली रातराणी अंगणात 
  शुभ्र चांदण्या रात्रीत 
 

शनिवार, १० जुलै, २०२१

दोन प्रहरी दोन नजारे


              सकाळि आकाश अगदि निरभ्र होत आणि वेड्या राघुंची हि जोडी अशि छान तारेवर बसलि होति ,कँमेरात कैद कराव अस दृश्य !

          दुपारी मग आकाश भरून आल ,पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच मी परत बाहेर येऊन बसले तर तारेवर राघु एकटाच बसलेला होता या एकट्या राघू कडे बघून उगाचच उदास वाटल , काय झाल असेल ,त्याचा जोडिदार कुठे असेल अस वाटून गेल.
         बरयाच दा या तारेवर दोन दोन जोड्या असतात ,स्वंच्छदी राघू मस्तित गिरक्या घेऊन परत तारेवर येऊन बसतात.अस एका नंतर एकाच चालुच असत .
     अश्यात दिवस भरातल्या या दोन दृश्यांनि जीवनाचि अनिश्चितता दाखवून दिली.

सोमवार, ५ जुलै, २०२१

सार्थक


         कडूलिंबा खाली विसावलेल्या गाई पहिल्या आणि परत एकदा ते झाड लावल्याच व काळजीने वाढवल्याच सार्थक झाल.

          माणसं ,पशु व पक्षी या सारयांनाच विसावा देणार, सावली देणार झाड,वृक्ष .
      अशी अनेक येती विसाव्या
       उन्हात सावली
      अन पावसात 
       आसरा 
  गर्द हिरवा 
मंडप हा
       शुद्ध प्राणवायु 
      गारवा ग्रिष्मात
      लेण भगवंताच
       देण भगवंताच

रविवार, ४ जुलै, २०२१

शिमला मिर्ची,फ्लाँवर ,टोमँटो आणि मिर्चि

 

   पावसाळा सुरू झाला कि नवीन रोप लावण्याची ,नवे पिक घेण्याची लगबग सुरू होते.

      पण या वर्षि पाय फ्रँक्चर असल्या मुळे सगळीच बोंब झाली. 

    तरी माझ बागकामावरच प्रेम माहीत असलेली नी त्याला हातभार लावणारी बरीच प्रेमाची माणस मला लाभलीत म्हणून या पावसाळ्यातही हा नियम चालुच राहीला .

      तर हिच ति जाऊंबाईनी पाठवलेली शिमला मिर्ची ,फ्लाँवर ,टोमँटो व मिर्चीची रोप ,ज्यांना संध्या ओट्यावरल्या कुंडीतच विराजमान व्हाव लागल .

      असो ,बघुया याला किती  फळ मिळत ते .

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...