शनिवार, १० जुलै, २०२१

दोन प्रहरी दोन नजारे


              सकाळि आकाश अगदि निरभ्र होत आणि वेड्या राघुंची हि जोडी अशि छान तारेवर बसलि होति ,कँमेरात कैद कराव अस दृश्य !

          दुपारी मग आकाश भरून आल ,पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच मी परत बाहेर येऊन बसले तर तारेवर राघु एकटाच बसलेला होता या एकट्या राघू कडे बघून उगाचच उदास वाटल , काय झाल असेल ,त्याचा जोडिदार कुठे असेल अस वाटून गेल.
         बरयाच दा या तारेवर दोन दोन जोड्या असतात ,स्वंच्छदी राघू मस्तित गिरक्या घेऊन परत तारेवर येऊन बसतात.अस एका नंतर एकाच चालुच असत .
     अश्यात दिवस भरातल्या या दोन दृश्यांनि जीवनाचि अनिश्चितता दाखवून दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...