गवत विविध प्रकारच असत , राज्यात ,देशात व जगातहि गवताच्या असंख्य जाति ,प्रकार असतिल.
जगातले काहि भाग चक्क गवताळ प्रदेश , कुरणं. म्हणून ओळखले जातात .
त्यात पावसाळ्यात या गवताला एक वेगळच रूप येत ,मग दवबिंदू ल्यालेल गवताच पात कवि मनाला चार ओळी तरी लिहायला प्रेरित करत, तर वारया संगे डोलणार गवत मनाची अवस्थाच जणू दाखवत, तर या दाट गवताला धरणिचा हिरवा शालू म्हणून संबोधल जात .
अश्या गवताला वेगवेगळ्या रंगाची फुल येतात तेव्हा डोळ्यां साठी हा नजारा सुखद असतो.
एक तर ते गवत उगवायला काहीच कराव लागत नाही म्हणजे पाऊस धारा पडायला सुरूवात झाली कि दुसरया - तिसरया पावसात सार रान हिरव होत आणि त्यात केलेल्या कोंदणा सारखी हि पिटुकली रंगी बिरंगी गवत फुलं त्याच सौंदर्य आणिकच वाढवता.
गवत फुल ,
आला पाऊस ,रानी -वनी
भिजली धरनी पानो -पानी
लेऊन लेन हिरव छान
झुळ झुळ मंजुळ
चालते गान
गवत फुलांनी सजले रान