गुरुवार, १७ जून, २०२१

नव्या घरात नवा पाहुणा

 

           आज  बरयाच दिवसां पासून पक्ष्यां साठी घरटी म्हणून ठेवलेल्या खोक्यात भांगपाडी मैना दिसली .केलेल्या प्रयत्नाच सार्थक झाल आणि कोणी तरी त्याचा घरट म्हणून स्विकार केला याचा खुपच आनंद झाला.

       

     दोन तिन दिवसां पासुन मैना पार्किंग मधे दिसत होती ,येरवि  चिमण्या कधि पारवा तर कधि कधि चिरका ची जोडी दिसायची पण  सारखा मैनेचा आवाज यायला लागला आणि मग जोडी हि दिसायला लागली आणि आज अखेरिस त्या बाक्स रूपि घरट्यातुन मैना उडतानां दिसली तेव्हा तिच्या दिसन्याचा अर्थ गवसला.
        मग काय निरिक्षण सूरू झाल तर गंमतच वाटली म्हणजे जेव्हा खाली चिमण्या दाणे खायला येत आणि चिवचिवाट करत तेव्हा मैना खोक्यातुन डोकावत राहते .
      जोवर आवाज बंद होत नाही तोवर ति बाहेर डोकावतच राहते.

    आणि बर का? नर बाहेर तारेवर बसुन असतो पण तो काय करतो तेव्हा मादी मैना घरट्यातून बाहेर येऊन सोबत ऊडून जातात .
         असो आत्ता या पाहुण्यांना इथे सुरक्षीत निवारा लाभून त्यांच्या पिल्लांचा आवाज लवकरच येकू येऊ देत व त्या पिल्लांच्या पंखात बळ येऊन उंच भरारी घेऊ देत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...