मे फ्लाॅवर ,मे महिन्यात येणार एक मोहक ,टपोर ! नाही ,नाही मोठ्ठ व गडद लाल रंगाच फुल .
याची पण एक गम्मंतच असते कारण मे मधे फुलं येऊन गेल्यावर काही दिवस लांबट ,थोडी कर्दळी ,केळी सारखी पान येतात पण काहि दिवसातच तिही राहत नाहीत .
मग त्या कुंडीत किंवा त्या जागेत काही झाड होत याच नामोनिशान नसत .
एखादा नवखा चुकुन तुमच्या ऐवजी बागेत आला तर त्या कुंडीत दुसर काही तरी लावून मोकळा होईल इतक त्याच अस्तित्व नाहिस होत पण -----
हे वरवर च त्या मातित खोल त्याच अस्तित्व असतच ते कंद रूपात .
अस पेरलेल वाया जात नाही यावर विश्वास ठेवायला लावणार "मे फ्लाॅवर" .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा