बरिच सुंदर झाड हँगिग मधे छान दिसताता. बाजारात तर बरयाच छान हँगिंग बासकेट्स मिळतात.
पण रिकाम्या वेळात युट्युबर बघुन बरेच प्रयोग चालु असतात त्यातलाच हा एक.
खरचर चिनी गुलाब थोडा उन्हातच छान फुलतो पण युट्युबवर तो छोट्या बाटल्यां मधे कुठे टांगलेला ,फुलांनी बहरलेला दाखवतात कि मग मी ही तो चाळा केला आणि लावले अगदि छोट्या कुंडीत ,थोड वारली पेंटींग करून ,सुतळीने बांधून लडकवले पण अध्याप त्याला फुल नाहीतच.
आणि खिडकीतले फाँक्सटेल व स्पाईडर प्लाँट काही छोट्या कुंड्यां मधे तर काही काही जापनिज कोकोडामा करून लटकवले काही फुटक्या मग मधे तर काही बुके सोबत आलेल्या कंटेनर मधे.
बागेत अशे प्रयोग चालुच राहणार कारण ति माझी प्रयोगशाळाच तर आहे😄
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा