अनंत ,गारडेनिया(इंग्रजी नाव) आणि गंधराज (हिंदी)हो हे एक मंद गंधाचे फुल, शुभ्र पांढरा रंग ,टपोर टवटवीत.
याची आणि माझी पहिली ओळख म्हणा किंवा भेट मी S.N.D.T.(औरंगाबाद) मधे बी.ए.करत असतांना आमच्या सायकोलाॅजीच्या' माया'मॅडम मुळे झाली .त्या हे फुल आपल्या केसात माळून यायच्या ,पूर्ण वर्गभर याचा दरवळ पसरायचा.
या आधि मी याचे नाव ही ऐकले नव्हते.नंतर बरयाच वर्षांनी एका झाड वाल्या कडून ते घेतले पण--- नविन पान फुटतानां जसे कोंब फुटतात तस मला वाटायच कि आली कळी कारण नविन पानं गुच्छ होऊन यायची ते वेगळे होई पर्यंत मला ती कळिच वाटायची .
पण काही दिवसात त्याची पानं गळायला लागली आणि हळूहळू ते पूर्णच वाळल.
परत दुसरया वर्षी नविन रोप घेतल ,ऊन पाहीजे म्हणून ऊन्हात लावल पण तरी ही ते नाहीच जगल.
आत्ता मागच्या वर्षी परत घेतल ,मागे राहणारया ऐकीने सांगीतल तिच्या कडे ते लागलय आणि फुलही येतात मग परत ठरवल एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे? शिवाय बजावल कि हे नाही जगल तर परत नाही घ्यायच.
कित्ती आनंद झाला मला, परत तो सुगंध अनुभवायला मिळणार व्वा! Thank you देवा ! Thank you झाडाला ! आणि मागच्या शेजारणिला व त्या विक्रेत्याला पण Thank you 😊.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा