सोमवार, २९ मार्च, २०२१

काहीच निरूपयोगी नाही

 

     ही अंजीराची फांदी,ज्याला वाळवी लागली म्हणून कापल,  बरेच दिवस झाले ,ते तसच पडून आहे .

      त्याच्या खाली पावडर सारख पडत होत म्हणून बघायला गेले तर ,त्यावर शंख दिसले आणि वाटल वाळवी लागली म्हणून झाडा  वेगळी केलेली फांदी ,त्यावर अजून काही जीव वाढताहेत

   शंख पाण्यात वाढतात असच वाटायच पण हे काय ?या मागच शास्र काय असेल . कमळाच्या पाण्यात आहेत ते शंख वेगळेच आणि हो स्नेंल्स् मुळे वेगळेच शंख हेही बागेतच .


  प्रत्येक शंखाचा रंग वेगळा ,रूपही वेगळे .पण हे मात्र नक्की की निसर्गातिल टाकून दिलेली प्रत्येकच गोष्ट कामाची असते ति दुसरया कुणाला काही तरी देऊन जाते अगदी गळलेले पान खत होत ,लाकडाची राख ही पोशन देते ,वाळलेली फुलं ही बरच काही देऊन जातात .नारळाला कल्पतरू म्हणत असलो तरी निसर्गातिल प्रत्येकच निर्मिती तिच्या पूर्ण नष्ट होई पर्यंत उपयोगाची असतेच.

रविवार, २८ मार्च, २०२१

प्रयन्नांती परमेश्वर ,अनंताला कळी दिसली एकदाची

 


अनंत ,गारडेनिया(इंग्रजी नाव) आणि गंधराज (हिंदी)हो हे एक मंद गंधाचे फुल, शुभ्र पांढरा रंग ,टपोर टवटवीत.
याची आणि माझी पहिली ओळख म्हणा किंवा भेट मी  S.N.D.T.(औरंगाबाद) मधे बी.ए.करत असतांना आमच्या सायकोलाॅजीच्या' माया'मॅडम  मुळे झाली .त्या हे फुल आपल्या केसात माळून यायच्या ,पूर्ण वर्गभर याचा दरवळ पसरायचा.
 या आधि मी याचे नाव ही ऐकले नव्हते.नंतर बरयाच वर्षांनी एका झाड वाल्या कडून ते घेतले पण--- नविन पान फुटतानां जसे कोंब फुटतात तस मला वाटायच कि आली कळी कारण नविन पानं गुच्छ होऊन यायची ते वेगळे होई पर्यंत मला ती कळिच वाटायची .
 पण काही दिवसात त्याची पानं गळायला लागली आणि हळूहळू ते पूर्णच वाळल.
परत दुसरया वर्षी नविन रोप घेतल ,ऊन पाहीजे म्हणून ऊन्हात लावल पण तरी ही ते नाहीच जगल.
आत्ता मागच्या वर्षी परत घेतल ,मागे राहणारया ऐकीने सांगीतल तिच्या कडे ते लागलय आणि फुलही येतात मग परत ठरवल एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे? शिवाय बजावल कि हे नाही जगल तर परत नाही घ्यायच.
 पण आज खुप छान वाटल त्याला खरच कळी आलीय

कित्ती आनंद झाला मला, परत तो सुगंध अनुभवायला मिळणार व्वा! Thank you देवा ! Thank you झाडाला ! आणि मागच्या शेजारणिला व त्या विक्रेत्याला पण Thank you 😊.

शनिवार, २७ मार्च, २०२१

सकाळीच धनेशाच दर्शन तेही निवांत



 
   आज सकाळी रोजच्या सारखीच बागेत फुल तोडायला गेले मोगरा ,जास्वंदीची फुल तोडली आणि एकदम मोठ्या पंखाचा पक्षी उडत आल्याचा आवाज आला (हो अस आवाजा वरून लक्षात येतच) आणि मागे वळून बघते तर धनेश अंजीराच्या झाडावर येऊन बसलाय.

    धनेश या आधि साधारण संध्याकाळी म्हणजे 4/5 वाजेच्या दरम्यान त्याझाडावर आलेला पूर्वी ,आज सकाळीच ! आणि तेही एकटाच .मी पूर्वी माझ्या Youtube chanel "Nisarg Thewa Japuya Gadya " वर धनेश ,grey hornbill बद्दल व्हिडीओ टाकला तेव्हा जोडी होती आणि नंतरही बरयाच दा जोडीच दिसली. आधी ती  परिसरातल्या पिंपळाच्या झाडावर दिसायची पण नंतर बागेत अंजीराच्या झाडावर .

     आत्ता काही पक्ष्यांना माझी भिती वाटत नाही अस वाटायला लागलय ,कारण फक्त चाहूल लागताच ऊडून जाणारे पक्षी आत्ता माझ्या येण्याची फारशी दखल न घेता त्यांना जे करायच ते करत असतात.

      तसच आज धनेशा बद्दल वाटल कारण मी बराच वेळ इकडून तिकडे करत फोटो काढले पण तो या फांदी वरून त्या फांदीवर करत राहीला आणि शेवटी मीच बागेतून निघून आले .

      आत्ता परत जोडीत दिसतिल अशी आशा करूया.

गुरुवार, २५ मार्च, २०२१

रोजनिशी झाडं,पक्षीआणि बरच काही


    रोज नव काही तरी दिसतच बागेत गेल की ,कधि एखादा असा पक्षी जो इथे दिसण्याची शक्यता नसते, कधि नव्याने उगवलेली बी,जी लावून खुप दिवस झालेत आत्ता तिला कोंब फुटतोय कधि पहिल्यादांच आलेली कळी, एकदिवस अचानक फुलांनी बहरलेल झाड,आपण पक्ष्यां साठी ठेवलेले दाणे खातानां पक्षी,अचानक झाडावर दिसलेल पक्ष्याच घरट अस सगळच.

      वाटल पक्षी निरीक्षण होतचय मग या निमीत्ताने रोजच कुठले पक्षी दिसले याची नोंद ही ठेवली जाईल वर प्रत्येक दिवशी येणारया अनुभवाच्या नोंदी या रोजनिशीत मांडता येतिल म्हणून हा नविन ब्लाँग आपली रोजनिशी ,झाडं,पक्षी आणि बरच काही.

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...