गुरुवार, १९ जून, २०२५

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )


 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.हि वनस्पती पावसाळ्यातच आढळते. याच्या पानांनचा उपयोग जखमा, व्रणांनवर बाह्य उपचारासाठी केला जातो.बिया कृमीनाशक म्हणून वापरल्या जातात तसेच पानांनचा रस कानातला पू बाहेरून  काढण्याच्या उपचारात वापरला जातो अस म्हणतात. आयुर्वेदात पोट फुगणे, अपचन,जळजळ यावर उपचारासाठी याचा वापर होतो.जि-याला स्वस्त पर्याय म्हणूनही याची लागवड  केली जातेय..लागवडी साठी सोपे आणि रेताड, निकृष्ट जमिनीवरही ही उगवते.
याचा वापर भाजी म्हणून नही केला जातो शिवाय बियांचा वापर करीत मसाला म्हणून किंवा  चटणी साठी केला जातो

आइस्क्रीम वेल(coral vine )(Antigonon leptopus)

कोरल वाईन हे याच  हे याच इंग्रजीतल नाव.. तशी याला अजून बरीच नाव आहेत, कोरालिटा,कोरल बेल्स, कोरल क्रिपर, हार्टस्आँन अ चेन,चायनीज लव वाईन,क्विन्स ज्वैल्स,ब्राईड्स टियर्स,बी बूश, माऊंटेन रोज अजून काहि नावं आहेत,हे अमिरिकेतून आलेल असल्यामुळे याला भारतिय भाषांन मधे नावं मिळण तस कठिणच, पण मराठीत याला आईस्क्रीम वेल, बंगालीत अनंतलता,तमिल भाषेत कोडीरोज किंवा कोटी रोजा,ओडिसात हि वेल मोठ्या प्रमाणात पसरलेली दिसते, ओडिया भाषेत याला बूंदी का फूल म्हणतात..
माझ्या बागेत हे आत्ताच आलय, मी गेली दोनतीन वर्ष याचा शोध घेत होते, पण ते आत्ता मिळाल..
सुंदर गुलाबी फुलांचे तोरणं... हो तोरणच आणि हे तोरण बघुनच ते मला हवहवस वाटलं.. खुपदा नावंच आठवत नव्हतं..
आहे ना सुंदर... गुलाबी, चिमुकली फुलं





 

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

गोकर्ण


 गोकर्ण ,गाईच्या काना सारखा आकार म्हणून गोकर्ण.अध्यात्मात याला बरच महत्व आहे शिवाय ,गोकर्ण महादेवाशी निगडीत अशी कथा/अख्याईका पण.

रंग : गर्द निळा ,पांढरा ,फिक्कट निळा हे रंग सर्वसाधारण पणेदिसून येतात पण 

यात हे रंग पण असावेत का?एका गृपवर आलेला हा फोटो.           नाव:

हिंदी : सुपली 

संस्कृत : अपराजीता      

इंग्रजी : Blue pea,asian -pigeon wing,butterfly- pea,

Clitoria-ternitea ,Babaceae या कुळातील                  याच्या फुलां पासून निळा रंग बनवतात.

श्रावण घेवड्याच्या आकाराच्या शेंगा पावसाळ्यात येतात आणि वाळल्या कि यातल्या बीयां पासुनच  नवे रोप उगवते.                          पान ,फुल ,मुळ्या,शेंगा ,साल या सगळ्यांचा औषध म्हणून उपयोग होतो या सगळ्यांचा रोगांवर औषध म्हणून उपयोग करून  बघा कधिच  पराजित होणार नाहि म्हणून  अपराजीता .                                             

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

चिनी गुलाब ,दशबेज ,पोर्टुलाका ग्रँडिफ्लोरा

 

चिनी गुलाब ,याला दशबेज असेही म्हणतात.इंग्रजी नाव पोर्टुलाका ग्रँडिफ्लोरा .हि पोर्टुलाकेसी कुटुंबातिल एक रसाळ वनस्पति आहे.मुळ दक्षीण ब्राझील अर्जेटीना,उरूग्वेचा बहुतेक भाग.आत्ता सर्वत्र घरगुति आणि सार्वजनिक बागां मधे याची लागलड केली जाते.                                                                 फार काळजी घ्यावी लागत नाही फक्त थोड पाणि आणि सुर्यप्रकाश असला कि या फुलांनी कुंड्या मस्त भरून जातात.

या प्रकारात वरचे काहि सिंगल पाकळीचे तर 👇

काही डबल पाकळीचे प्रकार दिसून येतात ज्यात गुलाब माॅस,अकरा वाजले,मेक्सिकन गुलाब,सुर्य गुलाब ,राॅक गुलाब अशी विविध नावे/ प्रकार आढळतात.

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

गणेश वेल

 

 
गणेश वेल ,एक नाजुक लाल फुल ल्यायलेली ,हिरव्या नाजुकश्या पानांची वेल.पावसाळा सुरू झाल्यावर आपोआप  उगवणारया अनेक वनस्पतीं पैकी एक.
साधारण श्रावणात फुललेल्या निसर्गातल अजुन एक फुल. गणपति बसतात तेव्हा हा वेल जरा जास्तच बहरलेला आसतो.
अनेक वेलांच्या गर्दीत बहरलेल्या ,पसरलेल्या या  वेलाच स्वत:च अस वेगळे अस्तित्व असत.
आपण याला गणेश वेल या एकाच नावाने ओळखत असलो तरी त्याला अनेक भाषां मधे वेगवेगळी नावं आहेत.
मला अर्थातच गुगल वरून ही माहीती मिळाली ,याचा इतर तपशिल नाही मिळाला .हो याच्या फुलां पासून अत्तर मिळते हे मात्र कळल .आपल्या भागात आपोआप ऊगवणारा हा वेल अँमेझान व इतर फुल झाडं विकणारया साईटवर विक्रीस उपलब्ध आहेत (त्यात काय विशेष? म्हणजे आपण गोमित्र,गौरया हे विकत घेतोच कि Onlineसध्या😄).
आत्ता नाव बघुया
इंग्रजी नाव:American jasmine
Bed jasmine
Cardinal creeper 
China creeper
Cupid flower
Cypress vine
Humming bird vine,
Forget me not
Indian pink
Sita's hairs
Star glory
Star of bethlehem
Sweet willy
उर्दू: इश्क पेंच                             
कानडी :कामलते                                     
तमिळ:कोशीरत्नम्                                
पंजाबी: पेंच                                          
मल्याळी:आकाशमुळ,इश्वर मुळ                              हिंदी:कोमलता,सीता केश                 
 संस्कृत:कामलता    
आणि आपल्या मराठीत हि याला अजुन नाव आहेत ती म्हणजे आकाश वेल ,गणेश वेल  ,इष्क पेंच
काय आहे ना गम्मत! तस नावात काय अस म्हणतात? पण हि नाव मिळण्या मागे बरच काही असेल नाही का?                  
               

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

सोनटक्का(Hedyachium coronarium)



 

सोनटक्का सुगंधी पांढरशुभ्र नाजुक फुल.बागेतला या वर्षीचा नवा मेंबर .लावल तर नोव्हेंबर मधे होत ,कर्दळी सारखा लांब दांडा मुळापासुन आणुन लावला . बरेच दिवस एकाचे चार झाले तरी कशालाच फुल नव्हत मग वाटल इथे नाहीच लागणार. ते मी नासिक हून आणल होत.

      पण पावसाने किमया केली ,सोबतच दोन दांड्याना घट्ट विणलेल्या वेणी सारख्या पेरांचे भरगच्च कळ्यांनी भरलेले गुच्छ /दांडे आले .मग ते उमलण्याची उत्सुकता लागली फार काही वाट बघावी लागली नाही आणि या नाजुक ,सुंगधी फुलाच दर्शन झाल एकदाच .पूर्ण फुलण्याच्या आधल्या दिवशी याच्या कळ्या पण छान लोंबत्या कानातल्या सारख्या  दिसतात आणि फुलं नाजुक असतात ,ति लगेच कोमेजतात म्हणून याच कळ्या बाजारात विकल्या जातात.

       असा हा सोनटक्का संध्याकाळी उमलतो ,सध्या सोनचाफा, परिजातक आणि सोनटक्का रात्री आणि पहाटेही परिसर त्यांच्या सुगंधाने व्यापुन टाकतात.नाजुक इतक की लगेच कोमेजेल आणि शुभ्र इतक की हात लावला तरी मळेल अस हे फुल 'सोनटक्का'.उमलल्यावर फुलाचा आकार फुलपाखरा सारखा दिसतो म्हणून इंग्रजीत याला 'Butterfly ginger lily' अस ही म्हणतात .

       हे झाड हळद आणि आल  या कुळातील  आहे आणि दलदलीच्या किंवा भरपूर पाण्याच्या ठीकाणी आढळतात, बारमही पुष्प असतात.

जिथे तिन्ही पाकळ्या एकत्र येतात त्याठिकाणी फुलाच्या मंध्यभागी पिवळ्या परागकणांची पिवळी धम्मक झाक असते.

   याची फुलं ,कंद ,खोड औषध निर्मितीत व सुंगधी द्रव्य बनवण्या साठी वापरतात.यात पिवळया रंगाचा पण सोनटक्का असतो ,पण तो दुर्मिळ.

 

      

 पान हिरलविगार ,समोरा समोर रचना असलेली यात ती फुल अजुनच उठुन दिसतात.

      तर असा हा सोनटक्का स्री सुलभ म्हणजे नाजुक ,सुंदर आणि बर का एखाद्या थकुन वा नाराज होऊन कोमेजलेल्या स्री ला सोनटक्क्याची उपमा दिली जाते ,आत्ता नाही ऐकीवात , पण पूर्वि एखाद्या मराठी चित्रपटात वा नाटकात किंवा मग कादंबरीत हे वर्णन ऐकायला मिळायच हे नक्की.

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...