गोकर्ण ,गाईच्या काना सारखा आकार म्हणून गोकर्ण.अध्यात्मात याला बरच महत्व आहे शिवाय ,गोकर्ण महादेवाशी निगडीत अशी कथा/अख्याईका पण.
रंग : गर्द निळा ,पांढरा ,फिक्कट निळा हे रंग सर्वसाधारण पणेदिसून येतात पण
यात हे रंग पण असावेत का?एका गृपवर आलेला हा फोटो. नाव:हिंदी : सुपली
संस्कृत : अपराजीता
इंग्रजी : Blue pea,asian -pigeon wing,butterfly- pea,
Clitoria-ternitea ,Babaceae या कुळातील याच्या फुलां पासून निळा रंग बनवतात.
श्रावण घेवड्याच्या आकाराच्या शेंगा पावसाळ्यात येतात आणि वाळल्या कि यातल्या बीयां पासुनच नवे रोप उगवते. पान ,फुल ,मुळ्या,शेंगा ,साल या सगळ्यांचा औषध म्हणून उपयोग होतो या सगळ्यांचा रोगांवर औषध म्हणून उपयोग करून बघा कधिच पराजित होणार नाहि म्हणून अपराजीता .