शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
लाजाळु (shame plant)
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Blister beetle
हे ब्लिस्टर बीटल ,आपण भुंगा म्हणुया कारण याच मराठी शास्त्रीय नाव मला नाही माहित .तर असा हा भुंगा आपण फोटोत बघतोय तस हे चार आहेत जास्वंदाच्या फुलावर ,नेहमी पावसाळ्यात दिसणारया काहि दृश्यांपैकी हे एक व याच ऋतुत दिसणारया अनेक किटकां पैकी हा एक.
जास्वंदाचे फुल पूर्ण फस्त करून टाकतात .या दिवसात हि फुल संख्येने पण खुप असतात .निसर्गातल्या जीवसृष्टितला आणिक एक जीव बागेत वावरतोय याच समाधान.
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१
श्रावण चाहुल
तेरडा अनेक सिजनल फुलांपैकी एक .जो श्रावणाच्या आगमनाचाच जणु संदेश घेऊन येतो.
नाजुक असतात हि फुल पण या ऋतुत सतत टवटवित दिसतात.एकेरी पाकळीचे , डबल म्हणजे जरा भरगच्च अशी हि फुल खुप रंगात येतात . त्यात माझ्या बागेत हाच रंग अगदि बी न टाकता ही जास्तच येतो आणि गणपति बसायचा थोड आसपास टप्पोरी ,डबल पाकळीची गर्द अश्या लाल चुटुक तेरड्याची तिन चार रोप उतरतात.
तर अश्या श्रावणाच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेल्या श्रावणावर, श्रावन चाहुली वर चार ओळी तो बनता है
तेरडा फुलला
किती रंगाचा
निळा ,तांबडा
पिवळा ,पांढरा
अबोली अन टिपक्यांचाही
सुरवंटाची गर्दी झाली ती
वृक्षांच्या पानोपानी
काहींची तर फुलपाखरे झाली
रंगा रंगाची ,काही छोटी तर काहि मोठी ही
भिरभर उडती या फुलां हून त्या फुंला वरी
नव रंगा चे, नव तेजाचे
रूप पालटले या धरणीचे
श्रृगांर पाचुचा काय त्या परी
नटली ति तर नवरत्नांने
तर्हे तर्हेच्या फुलांनी सजली
आगमने या श्रावणी
उंच डोंगर
शिरी धरती जलधारा त्या
शिवाच्या जटांपरी
तुशार सुंदर , उडती किती वर
दव बिंदू ते मोहविती मज
इंद्रधनुचा ताज आगळा
या अंबराच्या भव्य शिरावर
क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )
क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...

-
कोरल वाईन हे याच हे याच इंग्रजीतल नाव.. तशी याला अजून बरीच नाव आहेत, कोरालिटा,कोरल बेल्स, कोरल क्रिपर, हार्टस्आँन अ चेन,चायनीज लव वाईन,क्वि...
-
तेरडा अनेक सिजनल फुलांपैकी एक .जो श्रावणाच्या आगमनाचाच जणु संदेश घेऊन येतो. नाजुक असतात हि फुल पण या ऋतुत सतत टवटवित दिसतात.एकेरी प...