क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.हि वनस्पती पावसाळ्यातच आढळते. याच्या पानांनचा उपयोग जखमा, व्रणांनवर बाह्य उपचारासाठी केला जातो.बिया कृमीनाशक म्हणून वापरल्या जातात तसेच पानांनचा रस कानातला पू बाहेरून काढण्याच्या उपचारात वापरला जातो अस म्हणतात. आयुर्वेदात पोट फुगणे, अपचन,जळजळ यावर उपचारासाठी याचा वापर होतो.जि-याला स्वस्त पर्याय म्हणूनही याची लागवड केली जातेय..लागवडी साठी सोपे आणि रेताड, निकृष्ट जमिनीवरही ही उगवते.
याचा वापर भाजी म्हणून नही केला जातो शिवाय बियांचा वापर करीत मसाला म्हणून किंवा चटणी साठी केला जातो